ठाणे ः ठाणे-मुंबईत विक्रीसाठी पाच ट्रकमधून येणारा तब्बल 1 कोटी 70 लाख रुपये किमतीचा गुटखा पकडण्यात पोलिस आणि अन्न व औषध प्रशासन विभागास यश आले आहे. या प्रकरणी कासारवडवली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून वाहनचालकांना ताब्यात घेण्यात आले आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तंबाखूजन्य पदार्थ, गुटखा व तत्सम पदार्थांचे सेवन, विक्री व वाहतुकीवर बंदी घातली आहे. असे असतानादेखील तंबाखूजन्य पदार्थांसह गुटख्याची विक्री छुप्या पद्धतीने सुरू आहे.
ठाण्यातील गायमुख घोडबंदर रोड भागातून जाणाऱ्या रस्त्यावर पाच ट्रकमधून बेकायदा गुटख्याची वाहतूक करण्यात येणार असल्याची माहिती पोलिस आणि अन्न व औषध प्रशासन विभागाच्या पथकास मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे शुक्रवारी सायंकाळी पथकाने सापळा रचून संशयित ट्रकवर कारवाई करण्यात आली. या वाहनांची तपासणी केली असता, त्यात तब्बल 1 कोटी 70 लाख 45 हजार 596 रुपयांचा गुटखा सापडला. या गुटख्याच्या साठ्यासह 50 लाख रुपये किमतीची पाच वाहने
अन्न व औषध प्रशासन विभागाने जप्त केली असून या प्रकरणी कासारवडवली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Gutka worth Rs 2 crore seized from Kasarawadwali police
(संपादन ः रोशन मोरे)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.